|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » बँक कर्मचाऱयांनी पुकारला आज देशव्यापी संप

बँक कर्मचाऱयांनी पुकारला आज देशव्यापी संप 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

बँक कर्मचाऱयांचा आज, मंगळवारी देशव्यापी संप आहे. विलीनीकरणाचा विरोध आणि इतर मागण्यांसाठी बँक कर्मचाऱयांनी पुन्हा एकदा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाचा विरोध असून, डाव्या संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

केंद्र सरकारने देशातील दहा बँकांचे विलीनीकरण करुन चार मोठय़ा बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँकेचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण होईल. तर सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत, अलाहबाद बँक इंडियन बँकेत आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँकेत विलीन होईल.

परंतु या विलीनीकरणाला महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

 

Related posts: