|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » माझा पराभव करण्यासाठी ठाकरेंकडून पैशांचं वाटप : अभिजीत बिचुकले

माझा पराभव करण्यासाठी ठाकरेंकडून पैशांचं वाटप : अभिजीत बिचुकले 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांना पैसा वापरावा लागला असा आरोप ‘बिग बॉस’ फेम कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकलेंनी केला आहे. विधानसभा निवडणूकीत ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच त्यांच्या समोर ऍड. सुरेश माने आणि अभिजित बिचुकले यांचं आव्हान असल्यानं या मतदारसंघात रंगत आली होती.

बिचुकले म्हणाले, काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं वरळीतून चार कोटी रूपयांची रक्कम जप्त केली होती. ती रक्कम आपल्याला हरवण्यासाठी आणल्याचा दावा, बिचुकलेंनी केला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

मी मुंबईत आलो आणि मुंबईकरांनी आपल्याला खुप प्रेम दिलं. वरळीतून मी निवडणूक अर्ज भरला. परंतु माझी लोकप्रियता पाहून आपला पराभव करण्यासाठी पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप बिचुकलेंनी केला.

 

Related posts: