|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » लग्नपत्रिका व्हायरल : आलिया-रणबीरचे शुभमंगल जानेवारीमध्ये ?

लग्नपत्रिका व्हायरल : आलिया-रणबीरचे शुभमंगल जानेवारीमध्ये ? 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

प्रियांका चोप्रा, दीपिका-रणवीरनंतर आता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच सोशल मीडियावर आता आलिया-रणबीरची लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे. त्यानुसार जानेवारी 2020 मध्ये या जोडीचं जोधपूरमध्ये शुभमंगल होणार असल्याचं बोललं जातं आहे.

रणबीर-आलियाच्या नात्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्यात आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र दिसली. त्याचप्रमाणे या प्रेमी युगूलाने त्यांच्या नात्याचा स्वीकार देखील केला आहे. लवकरच रणबीर-आलियाचा ब्रम्हास्त्र चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लग्नपत्रिका समोर आली असताना दोघांच्या लग्नाची अफवा असल्याचं सांगण्यात येतं आहे. या पत्रिकेत अनेक त्रुटी असून आलियाच्या स्पेलिंग पासून ते आलियाचे वडील म्हणून महेश भट्ट यांच्या नावाऐवजी मुकेश यांचे नाव छापण्यात आले आहे. त्यामुळे ही लग्नपत्रिका चुकीची असल्याचं बोललं जातं आहे.

 

Related posts: