|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » इक्बाल मिर्चीचा साथीदार हुमायूं मर्चंटला अटक

इक्बाल मिर्चीचा साथीदार हुमायूं मर्चंटला अटक 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा जवळचा सहकारी आणि एकेकाळी ड्रग माफिया असलेला इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंधित लोकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केली आहे. ईडीने आज, मंगळवारी इक्बाल मिर्चीचा सहकारी हुमायूं मर्चंट याला अटक केली. मर्चंटकडे इक्बाल मिरचीचे पावर ऑफ अटॉर्नी आहे.

राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्‍ल पटेल आणि इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिरची यांच्यात असलेल्या कथित आर्थिक भागीदारीसंदर्भात ईडीने नुकतीच चौकशी केली आहे.

वरळीतील नेहरू प्लॅनेटोरियमजवळ असलेल्या मोक्मयाच्या ठिकाणचा भूखंड जो इक्बाल मिरचीच्या मालकीचा होता तो प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबीयांची मालकी असलेल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा.लि. च्या नावे हस्तांतरित करण्यात आला. याप्रकरणात दोन्ही कुटुंबांकडून रितसर करार करण्यात आला. त्यानंतर या जागेवर सीजे हाऊस या नावे 15 मजली व्यापारी तसेच निवासी इमारत उभारण्यात आली, असा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. या करारपत्रावर ईडीने आपले सर्व लक्ष केंद्रित केले आहे.

 

Related posts: