|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘झी युवा’च्या युवा कलाकारांनी सेटवरच साजरी केली दिवाळी

‘झी युवा’च्या युवा कलाकारांनी सेटवरच साजरी केली दिवाळी 

ऑनलाईन टीम / पुणे :

दिवाळी म्हणजे, प्रकाशाचा, दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. सगळेच जण अत्यंत उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीचा आनंद साजरा करण्यसाठी यावेळी ‘झी युवा’ वाहिनीचे कलाकार सुद्धा एकत्र आले आहेत. सण साजरा करण्यात कुठलीही कसर या सर्वांनी सोडलेली नाही. सर्व कलाकारांनी मिळून दणक्मयात हा दिवाळीचा सण साजरा केला आहे. नेहमीच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सर्वांनी दिवाळीचा आनंद लुटला.

नेहमी चित्रीकरणात व्यस्त असलेल्या कलाकारांना प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करणे शक्मय होत नाही. पण यंदा ‘झी युवा’ वाहिनीने या कलाकारांना दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आहे. वाहिनीच्या संपूर्ण कुटुंबाने सेटवर एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. ‘तू अशी जवळी रहा’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘साजणा’, ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ या सगळय़ाच मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन फराळाचा आनंद लुटला. भरपूर गप्पांसह, घरच्यांसाठी दिवाळीत काय काय विशेष करणार आहेत याविषयी सुद्धा कलाकारांनी चर्चा केली. शूटिंगमधून मिळालेल्या सुट्टीत घरी जाऊन दिवाळीच्या कामात हातभार लावणार असल्याचे सगळय़ाच कलाकारांचं म्हणणं आहे.

शरयू सोनावणे घरी खास कंदील करायला मदत करणार आहे. दामले कुटुंबाने नवे घर घेतले आहे; नव्या घरात आपल्या खरेदीचा वाटा काय असेल हे देखील निखिलने या गप्पांमध्ये सांगितले. गप्पांसोबतच या कलाकारांचा अंताक्षरीचा डाव सुद्धा रंगला. कलाकारांनी आपल्या मालिकांची शीर्षकगीते म्हणत हा आनंद वाढवला. दिवाळीच्या दिवसात सुट्टी मिळाली असल्याने दोन महिन्यानंतर घरी जात असल्याचा आनंद गौरीच्या चेहऱयावर दिसत होता. फराळातील पदार्थांपैकी, बनवण्यासाठी सगळय़ात कठीण असल्याने अनारसे आवडत असल्याचं अभिजितने सांगितलं. आईबाबांना दिवाळीत खास सरप्राईज देणार असल्याचं पूजाने सांगितलं आहे. दिवाळीचा माहोल सेटवर साजरा होत असताना, सर्व कलाकारांनी करण बेंदे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.

Related posts: