|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सेल्फ हेल्प ग्रुपची माध्यान आहाराची थकबाकी द्या

सेल्फ हेल्प ग्रुपची माध्यान आहाराची थकबाकी द्या 

प्रतिनिधी/ पणजी

 विद्यालयामध्ये माध्यान आहार पुरविणाऱया सेल्फ हेल्प ग्रुपची माधान्य आहाराची बिले अजून सरकारे फेडलेली नाही सुमारा 65 सेल्फ गुपचे मिळून 7 कोटीच्या वर रक्कम येणे आहे. 48 तासाच्या आत सरकारने त्यांचे पैसे दिले नाही तर आम्ही शिक्षण खात्यासमोर घेराव घालणार असल्याचे गोवा फोरवर्डच्या महिला मंचचा अध्यक्षा ऍड. अश्मा यांनी गोवा फोरवर्डच्या पणजी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

 गोव्यात महिला सेल्फ हेल्प ग्रुप बॅंकामध्ये कर्ज काडून हा माधान्य आहाराच धंदा करत आहे. सरकारने अनेक महिन्याची त्यांची बिले थकीत ठेवली आहे त्यामुळे   sआता त्यांची ऐन दिवाळीच्या तोंडावर उपासमारीची पाळी आली आहे. सरकारला याचे काहीच पडलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे. या सर्व महिला  गोमंतकीय असून त्या प्रामाणिकपणे धंदा करत आहे त्याचे पैसे ठेऊन सरकार  त्यांच्यावर अन्याय करत आहे, असे ऍड. अश्मा यांनी सांगितले.

 प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुपचे सुमारे 10 ते 12 लाख रुपये सरकार देणे आहे. सरकार  महिला स्वावलंबी होण्यासाठी या योजना सुरु केली होती. आता त्यांची बुडविले आहे त्याचे  कर्ज वाढत आहे. तरी सरकारने त्यांची बिले थकबाकी देत नाही हा एकप्रकार अन्याय आहे. आम्ही 48 तास वाट पाहणार त्यानंतर शिक्षिण खात्याच्या समोर निदर्शने काढणार आहे, असे यावेळी ऍड. अश्मा यांनी सांगितले.

Related posts: