|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » जाटलँड, ग्रामीण क्षेत्रात काँग्रेसची सरशी

जाटलँड, ग्रामीण क्षेत्रात काँग्रेसची सरशी 

हरियाणामध्ये मागील निवडणुकीत 15 जागांपुरती मर्यादित राहिलेल्या काँग्रेसला यंदा 30 जागांवर यश मिळाले आहे. मतमोजणीच्या कलानुसार काँग्रेसला यंदा सर्वाधिक लाभ राज्याच्या जाटलँड आणि ग्रामीण भागातून झाल्याचे दिसून येते. तर केवळ 10 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या जननायक जनता पक्षाला याच भागातून 10 जागांवर यश प्राप्त झाले आहे.हरियाणाचा विचार केल्यास काँग्रेसला 25 जागांचा लाभ झाला आहे. मागील निवडणुकीत जिंकलेल्या 7 जागा मात्र काँग्रेसला यंदा गमवाव्या लागल्या आहेत. याचबरोबर शहरी क्षेत्रात काँग्रेसला पुन्हा एकदा अपयशाचे तोंड पहावे लागले आहे. पण या नुकसानाची भरपाई काँग्रेसने जाटलँड आणि ग्रामीण भागांमधून करत वाढीव 25 जागा पटकाविल्या आहेत.

मतांची टक्केवारी वाढली…..

हरियाणा राज्यामध्ये मे महिन्या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 58 टक्के मते प्राप्त झाली होती. तर विधानसभा निवडणुकीत भाजपला 36 टक्के मतेच मिळाली आहेत.
5 महिन्यांनी झालेल्या या निवडणुकीत भाजपला 22 टक्के  मते गमवावी लागली आहेत. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपची मतांची टक्केवारी 3 टक्क्यांनी वाढली
आहे.

Related posts: