|Friday, December 6, 2019
You are here: Home » क्रिडा » क्रिकेटपटू साहाचा 35 वा वाढदिवस साजरा

क्रिकेटपटू साहाचा 35 वा वाढदिवस साजरा 

वृत्तसंस्था/ कोलकाता

तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट संघात दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत पुनरागमन करणारा बंगालचा यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धीमन साहाचा गुरूवारी येथे 35 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

साहाला त्याच्या वाढदिवसानिमित्त संघातील इतर क्रिकेटपटूंनी तसेच त्याच्या अनेक चाहत्यानी शुभेच्छा देत दीर्घायुष्य चिंतले. बंगाल रणजी संघाचा कर्णधार मनोज तिवारी, मयांक अगरवाल, रविचंद्रन अश्विन, कर्णधार कोहली तसेच भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱयांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Related posts: