|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » क्रिडा » विवेक चिकराला सुवर्णपदक

विवेक चिकराला सुवर्णपदक 

वृत्तसंस्था / शांघाय

बँकॉकमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरातिरंदाजी स्पर्धेत भारताचा तिरंदाज विवेक चिकराने सुवर्णपदक पटकाविले. पुरूषांच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात विवेकने वेंगचा 7-1 अशा गुणांनी पराभव करत प्रथम स्थानासह सुवर्णपदक मिळविले.

पुरूषांच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात विवेकने उपांत्य लढतीत दक्षिण कोरियाच्या बुमचा 7-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. विवेक चिकरा 2020 साली होणाऱया पॅराऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आशियाई पॅरानेमबाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती बलियन आणि शामसुंदर स्वामी यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकाविले. अंतिम लढतीत चीनच्या जोडीने त्यांचा 152-144 अशा गुणांनी पराभव केला.

Related posts: