|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांनी कळसा भांडुरा प्रकल्प मान्यतेवर योग्य पाऊल उचलावे

मुख्यमंत्र्यांनी कळसा भांडुरा प्रकल्प मान्यतेवर योग्य पाऊल उचलावे 

प्रतिनिधी/ पणजी

कळसा भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयानी मान्यता दिली असून यावरुन केंद्र सरकार कर्नाटक राज्याच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते. ही मान्यता देऊन केंद्र सरकारने गोव्याची जीवनदायीनी तोडलेली आहे. म्हादई विषय न्यायालयात असतातना सरकार हा निर्णय कसा देऊ शकतो? गोवा सरकार एक आणि केंद्र सरकार एक बोलत असल्याने विश्वास कोणावर ठेवावा ते कळत नाही. मुख्यमंत्र्यांनी यावर योग्य पाऊल उचलावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्वीस गोम्स यांनी काढले.

यावेळी पत्रकार परिषदेत सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर यांची उपस्थिती होती. एल्वीस गोम्स म्हणाले की जर म्हादईचे पाणी बंद झाले तर पाणी येणार कुठून? गोव्यात काही वर्षांनी पाणीच मिळणार नाही. गोवा सरकार केवळ आपले पक्ष टिकविण्यासाठीच झटत आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. तीनही खासदार गप्प आहेत. खरे तर खासदारांनी आता ठोस भूमिका मांडून हा प्रश्न निकाली लावायला हवा असेही ते म्हणाले

प्रदीप पाडगांवकर यांनी सांगितले की, सर्वांना माहिती आहे की म्हादईचे पणी बंद झाले तर गोव्याला फ्ढार मोठा फ्ढटका बसणार आहे. गोवा भाजप केवळ आपल्या पक्षाचे हीत पाहतात यात शंका नाही. मी आजही गोमंतकीय जनतेला एवढेच सांगू इच्छितो भाजपला सहकार्य केले तर त्याचा प†िरणाम हा असाच होईल.

Related posts: