|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अत्याधुनिक पद्धतीचा डेबरीज कचरा प्रकल्प राज्यात उभारणार

अत्याधुनिक पद्धतीचा डेबरीज कचरा प्रकल्प राज्यात उभारणार 

प्रतिनिधी/ म्हापसा

आज राज्यात जुनी घरे, इमारती आदी तोडून पुन्हा बांधली जातात मात्र या इमारतीची माती, कचरा, दगडी ब्लॉक आदी गाडय़ाभरून हमरस्त्यावर, डोंगराळ भागात, गल्लीत, रस्त्याच्या बाजूला वा नदीमध्ये फेकला जातो. अशा डेबरीज कचऱयापासून विदेशात सिमेंट टाईल्स, रेती आदी अत्याधुनिक मॉर्डन तंत्रज्ञानाच्या आधारे विदेशात केले जाते. असाच मॉर्डन तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय विदेशी कचरा प्रकल्प राज्यात उभारण्यात येणार असून सिनटेक या विदेशी कंपनीने भारतात राज्य सरकारकडे करारही सही केला आहे. राज्य कचरा मुक्त करण्याबाबत या आधारे राज्यसरकारने न्यायालयालाही प्रतीज्ञापत्र सादर केले असून या मॉर्डन आंतरराष्ट्रीय अत्याधुनिक पद्धतीच्या प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी सात सदस्यीय एक पथक, स्विडन व नोर्वे’ला रवाना होणार असल्याची माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पर्रा येथे आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

हा एक भाग झाला. दुसरी बाजू म्हणजे उर्जा कसा तयार होतो, मग तो ओला कचरा असो वा सुका कचरा, झाडे, माडाच्या झावळय़ाच्या आदी कचरा या प्रकारे विल्हेवाट लावण्यात येईल. यातून उर्जा कसा करता येईल हे लक्षात घेऊन याचा अभ्यास आम्ही पत्रकारांसमवेत करणार असून तो राज्यातील जनतेला दाखविणार आहोत असे मंत्री लोबो यांनी सांगितले. यावर अहवाल तयार करून राज्य सरकारला सादर करण्यात येईल. बायंगिणी येथे नवीन प्रकल्प येतो. काकोडा येथे तत्रज्ञान घालणार तसेच दक्षिण गोव्यात मोठा प्रकल्प उभारणार, तेथे अधिक काय करता येईल, बायोडायवर्सिटी प्रकल्प कुंडई येथे येणार जे विदेशात आहे ते येथे कसा आणता येईल, आम्ही कुठे मागे राहिलो याबाबत अभ्यास करण्यात येईल. ही सुविधा आम्ही पाहणार आहोत व अधिक कसे जोडता याकडे लक्ष देणार. हा कचरा उभारण्यापूर्वी पहिल्यांदा नागरिकांच्या मनात असलेले प्रश्न सोडविणार. राज्यात चांगल्या सुविधा देऊन कचरा समस्या सोडविण्यात येणार असल्याचे मायकल लोबो यांनी स्पष्ट केले. याबाबत जागा अद्याप नोंद केली नाही. सर्व काही अभ्यासानंतरच जागेबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री लोबो यांनी दिली.

कचरा व्यवस्थापन महामंडळ व राज्य सरकार यांच्यावतीने 7 सदस्य कचरा व्यवस्थापन बाबत माहिती जाणून घेण्यासाठी दि. 26 ते 1 नोव्हेंबर दरम्यान विदेशात नोरवेच्या अभ्यास दौऱयावर जात असून या दौऱयावेळी ते स्विडनला भेट देणार असून तेथील अत्याधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान व कचऱयाची विल्हेवाट अत्याधुनिक पद्धतीनी कशी लावली जाते याबाबत अभ्यास करून पाहणी करणार आहेत अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली. ाा सात सदस्यामध्ये मंत्री लोबो, 4 पत्रकार, मुख्य प्रतिनिधी, कचरा व्यस्थापन महामंडळाचे सरव्यवस्थापक व प्रदुषण महामंडळाचे अभियंता यांचा समावेश असेल. या आठ दिवसाच्या दौऱयात कचऱयाबाबत अभ्यास करणार आहे. यापूर्वी अशाच प्रकारचा दौरा 2013 मध्ये जर्मनी येथे केला होता व त्या धरतरीवर साळगाव येथे कचरा प्रकल्प आणण्यात आला होता.

उत्तर गोव्यात प्रकल्प आहे, दक्षिण गोव्यात नाही. आमदार भांडत आहे. तुझा कचरा माझा कचरा नको, रात्रीच्यावेळी वैद्यकीय कचरा डोंगराळ भागात टाकतात. कचऱयाला आग लागलेली पहायला मिळते. राज्यात कचरा डेबरेजची गरज असून तशा अत्याधुनिक पद्धतीचा प्रकल्प राज्यात येणे गरजेचे आहे हे पाहण्यासाठी आम्हाला बोलावण्यात आले आहे. यावेळी मेंबर सेक्रेटरी लेविरसन मार्टिन्स उपस्थित होते. त्यानी या दौऱयाबाबत अधिक माहिती देत या अभ्यासदौऱयातून खूप काही साध्य होणार असल्याची माहिती यावेळी पत्रकारांना दिली.

Related posts: