|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पावसामुळे पर्रा येथील अ. गो.आकाशकंदील रद्द

पावसामुळे पर्रा येथील अ. गो.आकाशकंदील रद्द 

दि. 3 नोव्हेंबर रोजी योजन

प्रतिनिधी/ म्हापसा

पर्रा सिटीझन फोअरम असोसिएशन व ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो पुरस्कृत शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर रोजी होणारी अखिल गोवा सहावी आकाश कंदील स्पर्धा पावसामुळे पुढे ढकलण्यात आली असून ही स्पर्धा आता येत्या 3 नोव्हेंबर रोजी ठरल्याप्रमाणे होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप मोरजकर यांनी पर्रा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी मंत्री मायकल लोबो, सरपंच डिलायला लोबो उपस्थित होत्या.

पुढे बोलताना प्रा. मोरजकर म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला आहे. सुमारे दोन हजारहून अधिक प्रवेशिका यंदा आल्या आहेत. या स्पर्धेसाठी आकर्षक अशी बक्षिसे ठेवण्यात आली असल्याने व ही स्पर्धा यंदा अखिल गोवा पातळीवर ठेवल्याने यंदा भरघोस प्रतिसाद लाभल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्री मायकल लोबो म्हणाले की, दरवर्षी आम्ही उत्तर गोवा मर्यादित ही स्पर्धा ठेवत होतो मात्र या स्पर्धेत भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने यंदा ही स्पर्धा अखिल गोवा पातळीवर ठेवण्यात आली आहे. आता या स्पर्धेला अन्य आठ दिवस मिळत असल्याने नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन मंत्री लोबो यांनी केले. नावनोंदणीसाठी इच्छुकांनी प्रदीप मोरजकर-9822139319 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Related posts: