|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्यावरण दाखला रद्द करावा

पर्यावरण दाखला रद्द करावा 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मागणी

प्रतिनिधी/ पणजी

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने कर्नाटकाच्या कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी दिलेला पर्यावरण दाखला त्वरित मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली असून तसे अधिकृत पत्र तातडीने केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. याप्रश्नी गोवा राज्य कोणतीही तडजोड करणार नाही. गरज भासली तर हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत नेऊन सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यम्ंात्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जलस्रोतमंत्री फ्ढिलीप नेरी यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी खासदार विनय तेंडुलकर हे दिल्लीत असल्याने त्यांनी खासदार म्हणून सदर पर्यावरण परवाना रद्द करण्याचे पत्र दिले आहे. गोवा सरकाराकडून शुक्रवारी अधिकृत पत्र पाठवले जाणार आहे. यासंबंधी आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडेही आपण चर्चा केली आहे.

जावडेकरांना परवाना रद्द करण्याची सूचना

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आपण स्वतः केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे बोललो आहे. त्यांनी आपण गोव्याच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे सांगितले. त्यांच्याशी दोनवेळा आपण फ्ढाsनवर बोललो असून त्यांना हा दाखला रद्द करण्यासाठीही सांगितले आहे. त्यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी दिल्लीला आपण जाणार होतो परंतु मंत्री जावडेकर चीनला जात असल्याने त्यांनी न येण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की म्हादईसंदर्भात आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाही. कर्नाटकाने जर साईट इन्स्पेक्शन केले तर त्यावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत. कर्नाटकाने तेथे जर काही प्रकल्प उभारला असेल तर तो बेकायेदशीर असल्याचेही ते म्हणाले.

नाफ्ता भरलेले जहाज अरबी समुद्रात भरकटले आहे. गुरुवारी रात्री हेलिकॉप्टरमधून दोघांना त्या जहाजावर उतरवून ते नियंत्रणात आणण्यात येईल. एमपीटीने याची माहिती आम्हाला दिली आहे.

Related posts: