|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » पिंपरी-चिंचवड, भोसरीतील 35 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त

पिंपरी-चिंचवड, भोसरीतील 35 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त 

 ऑनलाईन टीम / पिंपरी :

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील 41 पैकी तब्बल 35 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. तीनही मतदारसंघात दुरंगी लढाई झाल्याने उर्वरित उमेदवारांना मानहानीकारकपणे पराभव पत्करावा लागला आहे. हा एक नवीन विक्रम समजला जातो.

गेली अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा अखेर आज संपली. मतदार राजाचा कौल काहींसाठी तारक तर काहींसाठी मारक ठरला. काहींना तर स्वतःचे ‘डिपॉझिट’ही वाचविता आले नाही. उमेदवाराला मतदार संघात प्रत्यक्षात झालेल्या एकूण मतांच्या किमान एक ष÷ांश मते मिळणे आवश्यक आहे. मात्र, पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील बहुतांशी उमेदवार त्यात अपयशी ठरल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. तिन्ही मतदारसंघातून 41 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अवघ्या 3 उमेदवारांना त्यांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) परत मिळू शकणार आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघातून 18 उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी 1 लाख 77 हजार 387 मतदान झाले. येथील उमेदवाराला डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान 29 हजार 565 मतांची आवश्यकता होती. मात्र त्यात 16 उमेदवारांना अपयश आले. त्यात वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड (13681), बसपचे धनराज गायकवाड (1213), गोविंद हेरोडे (262), संदीप कांबळे (254) , बाळासाहेब ओव्हाळ (936), अ‍Ÿड. मुकुंदा ओव्हाळ (296) , अजय लोंढे (287), दिपक जगताप (295), चंद्रकांत माने (212), नरेश लोट (155), हेमंत मोरे (568), युवराज दाखले (482), अजय गायकवाड (461), डॉ. राजेश नागोसे (350), दिपक ताटे (430), मीना खिलारे (305) या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

चिंचवड मतदार संघातून 11 उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी 2 लाख 77 हजार 750 मतदान झाले. येथील उमेदवाराला किमान 46 हजार 292 मतांची आवश्यकता होती. मात्र, 9 उमेदवारांना एक षष्टांश मते मिळविता आली नाहीत. त्यात बसपाचे राजेंद्र लोंढे (3954), नितीशा लोखंडे (725), एकनाथ जगताप (569), महावीर संचेती (903), शेकापच्या छायावती देसले (569), सुरज खंडारे (384), डॉ. मिलिंदराजे भोसले (498), राजेंद्र काटे (332), रवींद्र पारधे (1475) या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

‘बिग फाईट’ म्हणून चर्चेत असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 62 हजार 976 एवढे मतदान झाले होते. त्यानुसार उमेदवाराला ’डिपॉझिट’ वाचविण्यासाठी 43 हजार 829 मतांची आवश्यकता होती. येथील 12 पैकी 10 उमेदवारांचे ’डिपॉझिट’ जप्त झाले आहे. त्यात समाजवादी पक्षाच्या वहिदा शेख (611) , विश्वास गजरमल (706), वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख (13165) , विजय आराख (426) , बसपचे राजेंद्र पवार (1861) , अपक्ष हरेश डोळस (243) , ज्ञानेश्वर बोऱहाटे (606) , भाऊसाहेब अडागळे (300), छाया जगदाळे (502), मारुती पवार (384) यांचा त्यात समावेश आहे.

Related posts: