|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » जादा भाडे आकारणाऱया 45 ट्रव्हल्सवर कारवाई

जादा भाडे आकारणाऱया 45 ट्रव्हल्सवर कारवाई 

ऑनलाईन टीम / पुणे :

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱया खाजगी ट्रव्हल्स बसेसवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संगमवाडी, येरवडा परिसरातील 45 खाजगी ट्रव्हल्स बसेसवर प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले.

राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे कमाल भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या दराच्या दीडपट पेक्षा जास्त भाडे खाजगी वाहतुकदारांना घेता येणार नाही. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध जिह्यातून पुणे शहरात आलेले नागरिक मुळ गावी जात असतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असते. त्याचा गैरफायदा घेत खाजगी ट्रव्हल्स एजंट, चालक अवाजवी भाडे आकारत असतात. दरम्यान, याबाबत काही दिवसापूर्वी वाहतुक शाखेतर्फे खाजगी ट्रव्हल्स कंपन्याचालक, एजंट आदी संघटनांच्या पदाधिकाऱयांची बैठक घेत त्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच खाजगी चालक जादा भाडे आकरत असल्यास त्यासंदर्भात संपर्क क्रमांक आणि व्हॉटसअप क्रमांक देवून नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संगमवाडी आणि येरवडा भागात जादा भाडे आकारणाऱया 45 खाजगी बसेसवर कारवाई केली. यापुढे जादा भाडे आकारणाऱया बसेसवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे.

Related posts: