|Sunday, January 19, 2020
You are here: Home » leadingnews » भूमिकेशी कठिबद्ध न राहणे जनतेला पटले नाही : शरद पवार

भूमिकेशी कठिबद्ध न राहणे जनतेला पटले नाही : शरद पवार 

ऑनलाईन टीम / बारामती :

भूमिकेशी कठिबद्ध न राहणे जनतेला पटले नाही. त्यामुळे पक्षांतर करणाऱया नेत्यांना जनतेने धडा शिकवला, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, लोकांच्या भावना समजावून घेतल्याने लोकांनी विधानसभा निवडणुकांमध्ये महाआघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले आहे. मात्र, सत्तेशिवाय राहू न शकणाऱया नेत्यांनी पक्षांतर केले. सत्तेसाठी सर्व काही विसरुन आपल्या भूमिकेशी कठिबद्ध न राहणाऱयांना जनतेला धूळ चारली.

राज्यात शेतकऱयांचे प्रश्न, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याची गरज होती. मागील दोन-तीन महिने राज्यात दौरे करत करत असताना ती मला प्रकर्षाने जाणवली. मी राज्य दौरा केला नसता तर जनतेने एवढा प्रतिसाद दिला नसता. महाराष्ट्र दौऱयात तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभला.

सध्याची तरुणाई विकासक आणि प्रामाणिकपणे काम करणारी आहे. त्यामुळे तरुण उमेदवारांनी लोकांशी सौजन्याने वागले पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील शेती, उद्योग आणि कारखानदारीची चिंता वाटत असल्याचेही पवारांनी सांगितले.

Related posts: