|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » महाराष्ट्रात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागतच : डॉ. अमोल कोल्हे

महाराष्ट्रात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागतच : डॉ. अमोल कोल्हे 

पुणे / प्रतिनिधी : 

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागत करेल, असं मत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. निकालात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापनं होणार हे निश्चित असताना दुसरीकडं नव्या समीकरणांच्या चर्चेने राजकीय वर्तुळात वेग घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काग्रेस असं नवं समीकरण जुळू पाहत आहे. या नव्या समीकरणावर राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे.

डॉ. कोल्हे म्हणाले, प्रचाराच्या काळात भाजपाकडून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यांना बगल देण्याचा प्रयत्न झाला. कलम 370 सारखे प्रश्न त्यांच्याकडून वारंवार पुढे आणण्यात आले. ग्रामीण भागातील मतदार असंख्य समस्यांना तोंड देत असताना त्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष केलं. यामुळेच ग्रामीण महाराष्ट्रानं भाजपाला नाकारलं. प्रचारासाठी आणखी अवधी मिळाला असता, तर शहरी महाराष्ट्रानंही युतीला नाकारलं असतं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं असल्यास त्यांनी राष्ट्रवादीसोबत यावं, असं सांगत नव्या समीकरणाच्या चर्चांना हवाच दिली आहे.

Related posts: