|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘अद्विता’ महिला उद्योजक प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

‘अद्विता’ महिला उद्योजक प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन 

पुणे / प्रतिनिधी :  

भारताच्या औद्योगिक क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यावा या साठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत. या योजनेच्या आधारावर महिलांना उद्योजक बनविणार्‍या “’अद्विता’या औंध येथिल  ठशेअर ए  स्पेस ठ येथिल  महिला उद्योजक प्रशिक्षण केंद्राचे  उद्घाटन मराठी अभिनेत्री गिरिजा ओक  गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी “अद्विता”च्या संस्थापिका सारिका देशमुख,पल्लवी लोडाया,उद्योजक अभिमन्य्ाु साबळे,अडव्हेाकेट  मानस ठाकोर व पोर्णिमा शेट्टे  हे  उपस्थित होते. 

सारिका देशमुख यांनी सर्वाचे स्वागत केले. “अद्विता हे पुण्यामधिल प्रथमच स्थापन झालेले  खास उद्योजक महिलांना प्रेरणा देणारे व त्यंाच्यात उद्योजकता  निर्मीतीव विकासासाठी स्थापन झालेले इनक्य्ाुबेशन सेंटर आहे. आवडीनुसार उद्योग उभारणीसाठी आर्थिक  व कायदेशीर  नियमानुसार पूर्तता करणे,सोयी सुविधा देणे , सल्ला, आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण , तज्ज्ञमंडळाचे मार्गदर्शन  ,तांत्रिक मदत , समुपदेशन  ,व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाणे व  उद्योजकांना   यशस्वी  होण्यासाठी पोषक वातावरण  निर्माण करणे अशा विविध उद्येश्याने या केंद्राची स्थापना झाली आहे.  

पल्लवी  म्हणाल्या, भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षण खाद्य पद्ार्थ व पौष्टीक आहार  आरोग्य आणि  सामाजिक  स्वास्थ्य  हस्तकला तंत्रज्ञान  पर्यावरण  पुरक  उद्योगअशा विविध उद्योगांसाठी  चांगला वाव असल्याने महिलांनी  या क्षेत्रातील उद्योगांची निवड करावी.सध्याच्या काळात नोकर्‍या मिळत नाहीत . त्या मुळे  स्वत:च उद्योजिका बनून समाजातील  गरजू लोकांना रोजगार प्राप्त करता यावा  हा या  मागील हेतू आहे. ”

Related posts: