|Sunday, January 19, 2020
You are here: Home » leadingnews » युतीच्या 50-50 फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी व्हावी : शरद पवार

युतीच्या 50-50 फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी व्हावी : शरद पवार 

ऑनलाईन टीम / बारामती :

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपशी 50-50 फॉर्म्युल्याचा दावा करत आहे, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून देण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली असेल, तर त्यामध्ये गैर काही नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच यावेळी शिवसेना स्वतःचा आब राखूनच सत्तेत सहभागी होईल, असेही पवार म्हणाले.

बारामती येथील निवासस्थानी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी व्हावी. भाजपने मागील वेळी शिवसेनेच्या काही बाबी राखून ठेवल्या होत्या. त्यामुळे शिवसेना भाजपचे सर्वच निर्णय मान्य करेल असे नाही. यावेळी शिवसेना हच्चा राखूनच सत्तेत सहभागी होईल.

राज्यातील तरुणाईने मला प्रचंड प्रतिसाद दिला. तर सत्तेत सहभागी होण्यासाठी काहींनी पक्षांतर केले. मात्र, लोकांना सत्तेची हाव पटली नाही. त्यामुळे त्यांनी पक्षांतर करणाऱयांना बाजूला केले. सध्या महाआघाडीच्या जबाबदाऱया वाढल्या आहेत. भविष्यात अनेक आव्हानांचा सामना करुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवू, असेही पवार म्हणाले.

 

Related posts: