|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » मनोरंजन » महाभारतमध्ये द्रौपदीच्या भूमिकेत ‘दीपिका पदुकोण’

महाभारतमध्ये द्रौपदीच्या भूमिकेत ‘दीपिका पदुकोण’ 

ऑनलाइन टीम / मुंबई :

रामायणावर ढिगभर सिरीयल आणि सिनेमेदेखील होऊन गेले आहेत. हिंदीबरोबर तमिळ आणि कन्नडमध्येही रामायणावर सिनेमे होऊन गेले आहेत. मात्र अजूनही महाभारतावरवर सिनेमा करण्याचा मोह सिनेनिर्मात्यांना आवरत नाही. आता दक्षिणेतील अईलू अरविंद, मधु मंतेना आणि नमित मल्होत्रा या तीन बडय़ा निर्मात्यांनी मिळून तीन भागांमध्ये या भव्यदिव्य प्रोजेक्टची निर्मिती करायचे ठरवले आहे.

या चित्रपटात ऋत्वकि रोशन तसेच दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार आहे. द्रौपदीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण झळकणार आहे. दरम्यान, दंगल फेम नितेश तिवारी आणि मॉम फेम रवि उदयवर यांच्यावर डायरेक्शनची जबाबदारी असेल. 2021 ला रिलीज होणाऱया या सिनेमासाठी हिंदी, तमिळ, तेलगू या तिन्ही फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

एवढेच नव्हे तर हे तीन भागातील ‘3डी’ महाभारत चक्क हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये असणार आहे. तब्बल 500 कोटी रुपये एवढे प्रचंड बजेट असलेल्या ‘महाभारत’मधील युद्धाचे प्रसंग दाखवण्यसाठी चक्क हाय एन्ड टेक्नोलॉजी वापरली जाणार आहे.

 

Related posts: