|Sunday, January 26, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘कल्पना एक आविष्कार अनेक’मध्ये अ बास्टर्ड पेट्रीयॉटची बाजी

‘कल्पना एक आविष्कार अनेक’मध्ये अ बास्टर्ड पेट्रीयॉटची बाजी 

एकांकिकांमध्ये वेगळेपण जपणाऱया ‘अस्तित्व’ आणि ‘चारमित्र कल्याण’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 33 व्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’मध्ये हवेतून अन्न निर्माण करून मानवी जीवन संपन्न करणारा ते रासायनिक शस्त्रांचा जनक अशी दोन टोके अतिरेकी राष्ट्रवादाने गाठणाऱया फ्रिट्झ हेबर या राष्ट्रभक्त वैज्ञानिकाची गोष्ट सांगणारी ‘दिशा थिएटर-ओमकार प्रॉडक्शन’ची ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’ ही एकांकिका सर्वोत्कृट ठरली. याच एकांकिकेने सर्वाधिक वैयक्तिक पारितोषिके पटकावली.

ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांनी ‘यंदा स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे’ ही कवी नामदेव ढसाळ यांच्या ‘निमित्त 15 ऑगस्ट 71’ या कवितेतील ओळ सादरीकरणासाठी विषय म्हणून सुचवली होती. त्या विषयाच्या अनुषंगाने 19 एकांकिका प्राथमिक फेरीत सादर झाल्या. प्राथमिक फेरीचे परीक्षण चंद्रकांत मेहंदळे, नीळकंठ कदम, प्रमोद लिमये आणि रमेश मोरे या मान्यवरांनी केले. या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सफजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात, याचा प्रत्यय यंदाही आला. अजित भगत, विजय निकम, सुनील हरिश्चंद्र, संदीप रेडकर, राकेश जाधव, प्रणव जोशी, प्रमोद शेलार, राम दौंड, दिशा दानडे, वर्षा दांदळे, भाग्यश्री पाणे, संदेश जाधव, वनिता खरात ही प्रस्थापित मंडळी आपल्या सफजनशीलतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेत आवर्जून उतरली. अंतिम फेरीचे परीक्षण विषयसूचक जयंत पवार, गिरीश पतके आणि रवींद्र लाखे यांनी केले.

लेखकांना महत्त्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक राजरत्न भोजने याला ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’ या एकांकिकेसाठी देण्यात आले. याच एकांकिकेसाठी सिमरन सैद या अभिनेत्रीला अभिनयाचे तफतीय पारितोषिक मिळाले तर संकेत-प्रथमेश सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि श्याम चव्हाण सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार ठरला. गुरुनानक खालसा महाविद्यालयच्या ‘कोकोरिको’ या एकांकिकेसाठी सूरज कोकरेöकुणाल पवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आणि सूरज कोकरेला अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तर देवाशिष भरवडे सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार ठरला. ‘एकता संघ, मुंबई’च्या ‘व्यवस्थित गाढव’ या एकांकिकेसाठी निशांत कदम द्वितीय सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर अविनाश साळवी याला अभिनयाचे पंचम पारितोषिक मिळाले. ‘प्रवेश मुंबई’च्या ‘सपोर्ट 377’ एकांकिकेसाठी दिशा दानडेला अभिनयाचे चतुर्थ पारितोषिक मिळाले.

Related posts: