|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » परंपरा-आधुनिकतेची मोट ‘श्री राम समर्थ’मध्ये

परंपरा-आधुनिकतेची मोट ‘श्री राम समर्थ’मध्ये 

संगीताचा आणि कौटुंबिक मनोरंजनाचा मेळ असलेला ‘श्री राम समर्थ’ चित्रपट येत्या 1 नोव्हेंबर 2019 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि दिशादीपा फिल्म्सच्या दीपा सुरवसे यांची निर्मिती असलेला हा चित्रपट भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तूत केला आहे. दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या श्री राम समर्थ चित्रपटची मूळ संकल्पना विधीतज्ञ विजया माहेश्वरी यांची आहे.

घराघरातील संस्कारांचा पाया असलेले मनाचे श्लोक याचे उदगाते राष्ट्रसंत रामदास स्वामी यांनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढय़ांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहिलेला दासबोध ग्रंथ आजच्या दैनंदिन कठीण प्रसंगात मार्गदर्शक ठरतो. त्यांनी बलोपासना, नामस्मरणाचे महत्त्व समजावून दिले. त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि मार्गदर्शन ‘श्री राम समर्थ’ चित्रपटात उलगडणार आहे. लग्नातील ‘सावधान’ या शब्दामागील नेमका अर्थ समजावून घेणारा अवघ्या 12 वर्षाचा छोटा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त केलेली सिद्धी संत रामदास स्वामींच्या ठायी पाहायला मिळते. स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे पुरस्कर्ते होते हे देखील चित्रपटात पाहण्यास मिळते. ‘श्री राम समर्थ’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संजय मराठे आणि महेश नाईक या जोडीने केले. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे तसेच नवोदित गायक बाळासाहेब सावंत आणि गायिका मीना निकम यांच्या आवाजात या चित्रपटातील पाच गाणी सजली आहेत.

स्वच्छ परिसर आणि समफद्ध समाज ही 400 वर्षांपूर्वी समाजात रुजवलेली संकल्पना आजही तितकीच महत्त्वपूर्ण ठरत आहे. अभिनेता शंतनू मोघे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, महेश कोकाटे, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजयासुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि अनेक नवोदित चेहरे चित्रपटात पाहायला मिळतील. बहुचर्चित सिनेकलाकारांच्या उत्तम आणि खुमासदार अभिनयामुळे या चित्रपटाला एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. हा चित्रपट रामदास स्वामींच्या चरित्रपटापेक्षा समाजातील सद्य परिस्थितीचे नेमके आणि मार्मिक वर्णन करणारा आहे. कथा-पटकथाöसंवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केले आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, नफत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी दिले आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Related posts: