|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले मोहीम

‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले मोहीम 

  दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य आणि आनंदाचा सण. या दिवाळी सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या गेल्यात. दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याची जुनी प्रथा आहे. लहानांसोबत मोठेही त्यात आनंदाने सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. या प्रथेचा धागा पकडून आगामी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या कलाकारांनी किल्ले बांधणीची मोहीम हाती घेत जुन्या प्रथेला उजाळा दिला.

  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता आस्ताद काळे, अजय पुरकर, हरिश दुधाडे, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, अक्षय वाघमारे, अभिनेत्री मफण्मयी देशपांडे, तफप्ती तोरडमल, रुची सावर्ण, नक्षत्रा मेढेकर या कलाकारांनी किल्ले बांधणी केली. उत्सवांच्या व्याख्या सध्या बदलत चालल्या असून त्या पार्श्वभूमीवर किल्ले बनवणे हा आनंदाचा ठेवा आहे. तो आवर्जून जपायला हवा यासाठीच आम्ही एकत्र येत या किल्ले बांधणीमध्ये आवर्जून सहभाग घेतल्याचे ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या कलाकारांनी यावेळी सांगितले. पराक्रमाचे, शौर्याचे इतिहासाचे प्रतीक असलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीला समजावा आणि जतन व्हावा तसेच त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने चित्रपट निर्मितीसोबत किल्लेबांधणीचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा करणाऱया आमच्या टीमचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचेल, अशी आशा कलाकारांनी व्यक्त केली. ए. ए. फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ येत्या 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Related posts: