|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » टोल आणणारे जिंकले, घालवणारे मात्र पराभूत

टोल आणणारे जिंकले, घालवणारे मात्र पराभूत 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरकरांना आमचं काय चुकलं ? म्हणून सवाल

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने कोल्हापूर जिह्यासाठी भरभरुन दिले. कोल्हापूर टोलमुक्त करून जनतेला दिलासा दिला. केएसबीपी कंपनीद्वारे शहराच्या सौदर्यात भर टाकली. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासह दोनपदरी इलेक्ट्रिक रेल्वे सुरु केली. अंबाबाई आराखडय़ासाठी निधी देऊन प्रत्यक्षात काम सुरु केले. तरीही कोल्हापूरच्या जनतेने भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना का नाकारले ? हा माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेचा कौल मला मान्य आहे, पण कोल्हापूरात आमचं काय चुकलं हे आम्हाला जाहीरपणे सांगावे असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. तरीही 2008 साली पुणे पदवीधर मतदारसंघातून माझ्यासह भाजपच्या दोन उमेदवारांनी बाजी मारुन काँग्रेस आघाडीला धक्का दिला. त्यानंतर 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाले. त्यानंतर जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीतही यशाची परंपरा कायम राहिली. लोकसभा निवडणुकीत तर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिह्यातील सर्व जागा जिंकल्या. पण विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या जनतेने आम्हाला का नाकारले याबाबत चिंतन करण्याची गरज आहे. विकासकामे करुन देखील आमचं काय चुकलं ? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 

 पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला विचारेले प्रश्न

टोल आणला ते विजयी झाले, आम्ही घालवला तर चूक केली काय ?

एलबीटी लावला ते विजयी, आम्ही घालवला ते चुकलो काय ?

कोल्हापूर बकाल केले ते विजयी, आम्ही शहर सुंदर बनवायचा प्रयत्न केला तर चुकलो काय ?

विमानसेवा बंद ठेवली ते विजयी, आम्ही सुरु केली ते चुकले काय ?

  रेल्वेसेवा आहे तशीच ठेवली, आम्ही दोनपदरी इलेक्ट्रिक केली तर चुकलो काय ?

  महालक्ष्मी आराखडा रखडवला ते विजयी, आम्ही निधी देऊन काम सुरु केले ते चुकले काय ?

  आयआरबी बोकांडी मारली ते विजयी. आम्ही घालवली तर  चुकलो काय ?

  कोल्हापूर पदमुक्त ठेवले ते विजयी, आम्ही महामंडळाची अनेक पदे दिली तर चुकलो काय ?

Related posts: