|Monday, December 9, 2019
You are here: Home » Agriculture » दिवाळीच्या दिवशी शिमगा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर

दिवाळीच्या दिवशी शिमगा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर 

ऑनलाइन टीम जालना
 जिल्ह्यातील घणसांगवी तालुक्यातील देवी गव्हाण या गावी आज सायंकाळी अचानक मोठा पाऊस , वादळ, वारा आणि त्याचबरोबर मोठ्यागारांचा मारा झाल्यामुळे खरीप पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे .
पशुधन मेले आहे तर या परिसरात हजारो पक्षी मरून पडले आहेत अशी धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेतला आहे .  
मागील पाच वर्षापासून शेतकरी वर्गास दुष्काळास तोंड द्यावे लागत असताना कशीबशी दिवाळी साजरी केली जात होती, पण यावर्षी 5 किलो सुद्धा कापूस बाजारात गेला नाही.
 त्यामुळे शेतकऱ्यांची कुटुंबे मात्र चिंतेत आहेत. पावसामुळे  सम्पूर्ण राज्यातील खरिप वाया गेले आहे  त्यामुळे राज्यपालानी हस्तक्षेप करून दुष्काळ जाहीर करावा . आठ दिवसात निर्णय झाला नाही तर राज्यव्यापी ” आक्रोश आंदोलन ” करावे लागणार आहे . असा इशारा देण्यात आला आहे

Related posts: