|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दुष्काळी आटपाडीवर वरुणराजाची कृपादृष्टी, 2 पूल पाण्याखाली

दुष्काळी आटपाडीवर वरुणराजाची कृपादृष्टी, 2 पूल पाण्याखाली 

आटपाडी : प्रतिनिधी

सलग दोन वर्षे तीव्र दुष्काळात होरपळनाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात चालू वर्षी जाता जाता वरूण राजाने दमदार हजेरी लावली. प्रारंभी टेंभू योजनेद्वारे अनेक तलावात पाणी सोडण्यात आले होते, आत्ता पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक ओढेनाले दुधडी वाहताहेत. तब्बल दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सांगली सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणारा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव तुडुंब भरला आहे.

या पावसाने माणगंगा नदी दुधडी वाहत आहे. दहा वर्षांनी मानगंगा नदीला पाणी आले असून आटपाडी तालुक्यातील आटपाडी ते पिंपरी खुर्द आणि कौठुळी ते लोटेवाडी हा सोलापूर जिल्ह्याला जोडणारे 2 पुल पाण्याखाली गेले आहेत. पाण्यात गेलेल्या या दोन्ही पुलावरून धोकादायकरित्या वाहतूक सुरू होती. अखेर पोलिसांनी पिंपरी खुर्द ला जाणाऱ्या पुलावर बॅरिकेट्स लावले.

दरम्यान आटपाडी आणि राजेवाडी या दोन तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे.

Related posts: