|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा क्षत्रिय मराठा समाज अध्यक्षपदी मंगेश चोडणकर

गोवा क्षत्रिय मराठा समाज अध्यक्षपदी मंगेश चोडणकर 

प्रतिनिधी/ पर्वरी

गोवा क्षत्रिय मराठा समाजाच्या सोमवार दि. 28 रोजी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या फेरनिवडणुकीत अध्यक्षपदी मंगेश शांबा चोडणकर यांची कार्यकारिणीसह बिनविरोध निवड करण्यात आली.

गोवा क्षत्रिय मराठा समाजाची कार्यकारिणी निवडणूक 40 वर्षानंतर लोकशाही पद्धतीने मतदान होऊन करण्यात आली होती. समाज परिवर्तन हा घोषवारा करीत मागच्या वष्घ 6 जून 2018 रोजी क्षात्रतेज सभागृहात निवडणूक पार पडली होती. निवडणुकीतील 18 कार्यकारिणी सदस्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज निर्वाचन अधिकारी सुनील शेट यांनी तांत्रिक कारणावरून फेटाळून लावले होते. तेव्हापासून निवडणूक वादाच्या भोवऱयात सापडली होती.

निर्वाचन अधिकाऱयांनी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेल्या रूपेश परब, राजेंद्र खोजुर्वेकर, गजानन भोसले, संतोष आखाडकर, पल्लवी भोसले, अमर हळर्णकर व अर्चना पांढारकर यांनी निर्वाचन अधिकारी निर्णयाच्या विरोधात म्हापसा वरिष्ठ सिव्हील न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांना समन्स पाठवून झालेल्या समझोत्यानुसार सातही उमेदवाराचे अर्ज अटीनिशी ग्राहय़ धरून निवडणूक लढविण्यास मुभा देण्यात आली होती. सातही उमेदवारांनी निवडणूक जिंकल्यास त्यांना न्यायालयाचा निवाडा बंधनकारक ठरविण्यात आला होता.

न्यायालयात सातही उमेदवारांच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर त्यांची अंतरिम स्थगितीसाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि निर्वाचन अधिकाऱयाचा निर्णय ग्राहय़ मानला ज्यामुळे सातहीजणांना अपात्र ठरविण्यात आले. निवाडय़ानंतर त्यांनी न्यायालयात याचिका सादर करून 15 दिवसांसाठी स्थगितीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या हमीवर दाखल करून घेतला होता.

हमी रक्कम भरण्याची सात उमेदवारांची 70 हजार रुपयांची रक्कम 15 दिवसाच्या मुदतीत न्यायालयात जमा केली नाही त्यामुळे न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन झाले. त्यामुळे त्यांची याचिका निकालात काढून निर्वाचन अधिकाऱयांनी फेरनिवडणूक सोमवार 28 रोजी घेऊन नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे घोषित केली.

अध्यक्ष-मंगेश चोडणकर, उपाध्यक्ष-संतोष खोजुर्वेकर, महासचिव-गुरुदास वळवईकर, सचिव-मधू मालवणकर, खजिनदार-प्रताप फडते, सदस्य-युवराज साळगावकर, मोहन चोडणकर व मीना हळर्णकर यांचा समावेश आहे.

न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानुसार अपात्र ठरलेल्या उमेदवारानंतर जास्त मते प्राप्त झालेल्या उमेदवारास विजयी घोषित करण्यात यावे यानुसार निर्वाचन अधिकाऱयांनी निर्णय घेऊन फेरनिवडणूक पार पाडली.

नवीन कार्यकारिणीसाठी प्रत्येकी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे कार्यकारिणीची बिनविरोध झाल्याची निर्वाचन अधिकारी शेट यांनी जाहीर केले.

निवडणुकीसाठी क्षात्रतेज सभागृह आरक्षित करून ऐनवेळी सभागृहांना कुलुपे लावून निवडणुकीत बाधा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्वाचन अधिकाऱयांना सभागृहाच्या बाहेर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. निवडणुकीवेळी दोन गट होऊन गोंधळ होणार असे लेखी निवेदन पोलिसांना देण्यात आले होते, त्यामुळे पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच म्हापसा मामलेदार राहुल देसाई कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपस्थित होते.

गोवा क्षत्रिय मराठा समाज निवडणूक संदर्भात म्हापसा सिव्हील न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत फिर्यादीसाठी ऍड. सुहास वळवईकर यांनी काम पाहिले तर निर्वाचन अधिकाऱयांसाठी ऍड. चैतन्य पाडगावकर यांनी बाजू मांडली.

 

Related posts: