|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आमदार विनय कोरेंचा भाजपला पाठिंबा

आमदार विनय कोरेंचा भाजपला पाठिंबा 

वारणानगर : प्रतिनिधी

जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांनी आपला जाहीर पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार कोरे यांनी शाहुवाडी – पन्हाळा मतदारसंघातून २८ हजार मताधिक्याने विजय मिळविला. महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून जनसुराज्य शक्ती पक्ष यापूर्वीही भाजपबरोबर राहिला आहे. यावेळी मात्र घटक पक्ष नसल्याचे सांगून निवडणुकीत स्वत: सह अन्य तीन उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र आ. कोरे हेच विजयी झाले. निकालानंतर त्यांनी पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे भाजपला पाठिंबा दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी अनेकवेळा भाजपशी हातमिळवणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. कोरे यांची पाठींब्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.

Related posts: