|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस 

शहरातील रस्त्यावर साचले पाणी

प्रतिनिधी/ सोलापूर

परतीचा पाऊस संपूनही ऐन हिवाळ्यात बुधवारी शहर, जिह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. शहरातील शिवाजी चौक, लष्कर, मोदी, रेल्वे स्टेशन रोड यासह प्रमुख चौकात पाणीच पाणी साचले होते. काही ठिकाणी वीज गेलेली होती.

   सोलापूर जिह्यात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, उत्तरा नक्षत्र, परतीच्या पावसामुळे सोलापूर जिह्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू असून, सध्या 80 टक्केहून अधिक पाऊस झालेला आहे. दरम्यान मागील चार-पाच दिवसांपासून सायंकाळी जिह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजेच्या कडकडासह जोरदार पावसामुळे शहरातील कित्येक चौकाचौकात पाणी साचले होते. शिवाजी चौक, डफरीन चौक, रेल्वे स्टेशन रोड, येडशी-सोलापूर मार्ग, दत्त चौक, नवी पेठ, सिव्हील हॉस्पिटल रोड, मोदी, लष्कर यासह दक्षिण सोलापूर, माळशिरस, मोहोळ, माढा, अक्कलकोट, बार्शी यासह तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. 

        रब्बी पेरणीचा खोळंबा

दीड महिन्यापासून जिह्यात पाऊस थांबायचा नाव घेत नाही. यामुळे जमिनीला वापसा येत नसल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याचे दु:ख पचवत असतानाच सतत येणाऱया परतीच्या पावसामुळे रब्बीवर पाणी सोडावे लागेल, अशी भीती शेतकऱयांमधून व्यक्त होत आहे. सततच्या पावसामुळे भाजपीपाल्यासह अन्य पिके धोक्यात आली आहेत.

Related posts: