|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दीड लाखांचे दागिने लंपास

दीड लाखांचे दागिने लंपास 

प्रतिनिधी/ सांगली

येथील हॉटेल विहार जवळ असणाऱया घराचे कुलूप चावीने उघडून कपाटातील 1 लाख 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरटय़ाने लंपास केले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत निलोफर जावेद तांबोळे (वय 30 रा. केसरे गल्ली, हॉटेल विहार जवळ, सांगली) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरटय़ाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की तांबोळे यांचे येथील खणभागात केसरे गल्लीत घर आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या होत्या. कुलूपाची किल्ली तिथेच चौकटीजवळ ठेवली होती. मंगळवार 29 रोजी त्या परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या दरम्यान चोरटय़ांनी चौकटीजवळ ठेवलेली किल्ली घेत कुलूप उघडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे नेकलेस, बाजूबंद, कानातील वेल असा 1 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तांबोळे यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानुसार अज्ञात चोरटय़ाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरटा जवळचाच असावा असा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसारच तपास करण्यात सुरु आहे.

Related posts: