|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसाठी ५ नोव्हेंबरला प्रशिक्षण कार्यशाळा

नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसाठी ५ नोव्हेंबरला प्रशिक्षण कार्यशाळा 

विटा/प्रतिनिधी

ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांनी सक्षमपणे ग्रामपंचायतीचे लोकाभिमुख कामकाज आणि गावाचा सर्वांगीण विकास करावा. गावाबरोबर तालुक्याच्या विकासात ही योगदान द्यावे, यासाठी उपयुक्त अशा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सभापती मनिषा बागल आणि उपसभापती बाळासाहेब नलवडे यांनी सांगितले.

ग्राम विकास विभाग, जिल्हा परिषद, सांगली , खानापूर पंचायत समिती आणि रयत शिक्षण संस्थेचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र ,वर्येसातारा यांनी संयुक्तपणे दि.५ ते ७ नोव्हेंबर विटा येथे खानापूर पंचायत समितीच्या सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या तीन दिवशीय नियमित प्रशिक्षणात सरपंच, उपसरपंच, सदस्यांना आपली जबाबदारी, अधिकार, कर्तव्य , कामे त्याच बरोबर ग्रामपंचायतीच्या कायदयातील ठळक तरतुदी, अंदाजपत्रक, सभा कामकाज ,कर आकारणी, अपात्रतता, ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती अशा उपयुक्त विषयांची तज्ञाच्या कडून मार्गदर्शन आणि माहिती करुन दिली जाणार असल्याचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे विजय जाधव यांनी सांगितले.

भेंडवडे(गा.),साळशिंगे,देवनगर,भाग्यनगर, भेंडवडे (रा.),पळशी, वासुंबे,घानवड,गार्डी, कळंबी या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधीत ग्रामपंचायतीच्या सरपंच, सर्व सदस्यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी केले आहे.

Related posts: