|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » solapur » सोलापुरात पुन्हा हेल्मेट कारवाई

सोलापुरात पुन्हा हेल्मेट कारवाई 

सोलापूर : प्रतिनिधी

शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहनच्या वतीने उद्या, शुक्रवार पासून शहरात विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास अशा सर्वांचा वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे.

वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे सीट बेल्ट न वापरणे तसेच हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनधारकांना विरुद्ध सक्त कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर शहरात हेल्मेट बाबतची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईने चांगलाच परिणाम झाल्याचा दिसत असतानाच अचानक कारवाई थंडावली होती. दरम्यान तीन चार महिन्याच्या अवधीनंतर आता पुन्हा हेल्मेट कारवाई होणार आहे.

दुचाकी चालकांनी वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये चार चाकी वाहन चालकाने सीट बेल्टचा वापर करावा अशा सूचना वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या पहिल्या गुन्ह्यात वाहन चालकाचा परवाना तीन महिन्यासाठी रद्द करण्यात येणार आहे यानंतर दुसऱ्या वेळेस अशा प्रकारचा गुन्हा संबंधित चालकाकडून झाल्यास त्याच्याकडील पाहण्याची वाहन नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.

Related posts: