|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » पाचव्या सत्रातही बाजाराची उच्चांकी झेप

पाचव्या सत्रातही बाजाराची उच्चांकी झेप 

वृत्तसंस्था /मुंबई :

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सलग पाचव्या सत्रातही तेजीचा उत्साह राहिल्याचे पहावयास मिळाला आहे. बुधवारी 40 हजारचा टप्पा पार गुरुवारीही कायम ठेवण्यात बाजार यशस्वी झालेला आहे. दिवसभरातील व्यवहारात येस बँकेचे समभाग 24 टक्क्यांनी तेजीत होते. तर आयटी आणि बँकिंग यांचे निर्देशांकही व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव बीएसई बाजारावर झाल्याचे पहावयास मिळाले आहे. 

दिवसभरात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 40, 392.22 वर वधारत नवीन विक्रमाची नोंद केली होती. परंतु दिवसअखेरीस बीएसई सेन्सेक्स 77.18 अंकानी वधारुन निर्देशाक 40,129.05 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 33.35 अंकानी वधारत निर्देशांक 11,877.45 वर बंद झाला आहे. सलगच्या पाचव्या सत्रातील तेजीमुळे बाजारात सेन्सेक्सने मजबूत कामगिरीची नोंद केली आहे.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात तिसऱयाद करण्यात येण्याच्या चर्चेमुळे त्याचा प्रभाव भारतामधील शेअर बाजारावर झाला आहे. त्यासोबत प्रमुख कंपन्यांनी आपले तिमाहीतील नफा कमाईचे आकडे सादर करत आहेत. त्याचा अंदाज घेत गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करत आहेत. तर मुख्य कंपन्यांमधील समभागांची मोठय़ा प्रमाणात खरेदी करत असल्याचे गुरुवारी दिसून आले आहे.

बीएसमधील प्रमुख कंपन्यांमधील स्टेट बँक, इन्फोसिस, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि एचडीएफसी यांचे समभाग 7.69 टक्क्यांनी वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, ऍक्सिस बँक, टाटा स्टील, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मात्र 2.09 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.

मुख्य क्षेत्राची कामगिरी

दूरसंचार, आयटी, रियल्टी आणि हेल्थकेअर यांचे निर्देशांक 1.97 टक्क्यांनी तेजीत राहिले असून धातू निर्मिती, ऊर्जा आणि कॅपिटल गुड्स यांचे निर्देशांक 0.51 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.        

 

Related posts: