|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रस्त्यावर धुम्रपान करणे पडले महागात

रस्त्यावर धुम्रपान करणे पडले महागात 

अरुण रोटे /सोलापूर :

मेडिकल हब म्हणून ओळख निर्माण करणाऱया सोलापुरात ठिकठिकाणी धुम्रपान आणि पान-गुटखा खाऊन थुंकणाऱयांचा त्रास वाढला असून, अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी शहरात पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून आठवडाभरात 100 जणांवर कारवाई करण्यात आली. यापुढे अशा प्रकारच्या कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांपासून 100 मीटर हद्दीत धुम्रपानावर बंदी असून, या भागात नियमांचे उल्लघंन करुन सर्रास पानटपऱया दिसून येत आहेत. शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसरात बिनधास्तपणे पानटपऱया थाटून तरुणांना व्यसनाधिनतेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासर्व बाबींचा विचार करुन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाईच्या सूचना पथकाला दिल्या आहेत. सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा 2003 नुसार शहरात कारवाईला वेग आला आहे. शहरातील सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुम्रपान कारवाई करण्यात येत आहे.

आतापर्यंत पोलिसांनी सुमारे 100 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.  शहरातील महाविद्यालये आणि शाळा परिसरात असलेल्या टपऱयाविषयी तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसारही पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कारवाईला वेग आला आहे. पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या परिसरात येणाऱया शाळा, महाविद्यालय, रुग्णालये, तसेच सार्वजनिक रस्त्यावर धुम्रपान करणाऱयावर लक्ष केंद्रीत केले आहे. धुम्रपान करताना दिसला की, त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्याचबरोबर पानटपरी धारकांवरही कारवाई करण्यात येत आहे. शहर आयुक्तालयातील पोलिसांचे एक स्वतंत्र पथकच यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई होणे अपेक्षित आहे, मात्र त्यांच्याकडून कारवाई होताना दिसून येत नाही.

Related posts: