|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » साठ हजारांची लाच घेताना शाखा अभियंता रंगेहात सापडला

साठ हजारांची लाच घेताना शाखा अभियंता रंगेहात सापडला 

 पंढरपूर / प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱयास पदस्थापना चुकीची आहे. याबाबत लेखापरिक्षण अहवालात नोंद करत नाही. यासाठी एक लाख रूपयांची मागणी स्थानिक निधी लेखा कार्यालय सोलापूरचे लेखापरिक्षक धर्मा पवार यांनी केली होती. यामध्ये शाखा अभियंता ज्ञानेश्वर पवार हे देखिल सहभागी होते. यामध्ये 60 हजारांची लाच घेताना ज्ञानेश्वर पवार लाचलुचपत विभागाला रंगेहात सापडले आहेत.

   याबाबत अधिकची माहीती अशी की, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात काम करणारे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे तक्रारदार कर्मचारी आहेत. या तक्रारदार कर्मचा-यांच्या पदस्थापनेमधे काही त्रुटी होत्या. सदरच्या त्रुटींचा लेखापरिक्षण अहवालात उल्लेख करीत नाही. उल्लेख केला तर नोकरी जाईल. अशी भिती देत सोलापूर कार्यालयातील लेखापरिक्षक धर्मा पवार यांनी एक लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार कर्मचारी यांनी पंढरपूर येथील शाखा अभियंता ज्ञानेश्वर पवार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेअंती गुरूवारी दुपारी एक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात लाखांऐवजी 60 हजार रूपयांची लाच देण्याचे ठरले आणि सदरची रक्कम दिली गेली. यावेळीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचून रंगेहात पकडले.

   यानंतर शाखा अभियंता ज्ञानेश्वर पवार आणि धर्मा पवार यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जगदीश भोपळे, निळकंठ जाधवर, सहा. फ्ढाwजदार संजय बिराजदार आदिंच्या पथकांने केली आहे.

 

Related posts: