|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » शेतकऱयांना तातडीने भरपाई मिळवून देणार : शरद पवार

शेतकऱयांना तातडीने भरपाई मिळवून देणार : शरद पवार 

ऑनलाइन टीम / नाशिक : 

परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोटी येथे सांगितले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. टाके घोटी येथील शेतकऱयांच्या शेतात जाऊन पवार यांनी पाहणी करीत शासकीय अधिकाऱयांकडून अधिक माहिती घेतली.    

इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. खरिपाचे पीक या सततच्या पावसाने भिजून गेले आहे. कापणी करण्यात आलेले पीक अक्षरशः खराब झाले आहे. खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्मयातील शेतकरी वैफल्यग्रस्त झाले असल्याने ह्या शेतकऱयांना न्याय द्यावा, तातडीने नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांचे निवेदन पवार यांना यावेळी देण्यात आले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे,सरोज अहिरे, माजी खासदार देविदास पिंगळे आदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि पदाधिकाऱयांनी निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली. माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी पवार यांना इगतपुरी तालुक्यातील पाऊस ह्यावषी प्रचंड प्रमाणात सरासरी ओलांडून झाला असल्याचे सांगून सर्व शेतकऱयांना दिलासा देण्याची मागणी केली.

 

 

Related posts: