|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Top News » दिल्लीमध्ये हेल्थ इमर्जन्सी जाहीर, मंगळवारपर्यंत शाळा रहाणार बंद

दिल्लीमध्ये हेल्थ इमर्जन्सी जाहीर, मंगळवारपर्यंत शाळा रहाणार बंद 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे प्रदुषणात वाढ झाली आहे. तसेच वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून पुढच्या आठवडय़ात आणखी खालावण्याची शक्यता आहे. दिवाळीमध्ये मोठय़ा प्रमाणात फटाके फोडल्यामुळे प्रदुषणात वाढ झाली असून श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने दिल्ली आणि नोएडामध्ये हेल्थ इमर्जन्सी लागू केली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत बांधकामांवर बंदी आणि दिल्लीतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूपच खराब आहे. वायू प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दिल्ली सरकारने शुक्रवारी (1 नोव्हेंबर) शाळकरी मुलांना मास्कचे वाटप केले आहे. शाळकरी मुलांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी 50 लाख मास्कचं वाटप करण्यात आलं आहे. दिल्लीतील नागरिकांनी देखील प्रदूषणाचे परिणाम टाळण्यासाठी मास्क वापरावेत, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच 5 नोव्हेंबर पर्यंत सर्व शाळांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

Related posts: