|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leadingnews » झारखंड विधानसभा निवडणूक : पाच टप्प्यात मतदान, निकाल 23 डिसेंबरला

झारखंड विधानसभा निवडणूक : पाच टप्प्यात मतदान, निकाल 23 डिसेंबरला 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूकांनंतर झारखंड विधनसभा निवडणूकचे बिगुल वाजले आहे. या ठिकाणी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, त्यानंतर 7 डिसेंबर रोजी दुसऱया, 12 डिसेंबर रोजी तिसऱया, 16 डिसेंबर रोजी चौथ्या आणि 20 डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज, शुक्रवारी जाहीर केलं.

सुनील अरोडा म्हणाले, येत्या 5 जानेवारी रोजी झारखंड विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या पाच उपायुक्तांनी 17-18 ऑक्टोबर रोजी झारखंडचा दौरा केला होता. झारखंडमध्ये एकूण 19 जिल्हे नक्षल प्रभावित असून त्यातील 67 मतदारसंघ नक्षल प्रभावित आहेत.

दरम्यान, झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.

 

Related posts: