|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » येत्या 48 तासात मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या 48 तासात मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज 

पुणे / प्रतिनिधी : 

राज्यातून मान्सून परतीच्या तयारीत असला तरी कोकण, मध्य महाराष्ट्रात मात्र, पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारपासून कोकण, मुंबई व मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच येत्या 48 तासात मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

‘महा’ चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील ’महा’ या चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील जिह्यांना बसण्याची शक्यता असल्याचा अंजाजही हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे आधीच नुकसानीत अडकलेला शेतकरी आता पुढचे काही दिवस आणखी भरडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.

3, 4 आणि 5 नोव्हेंबरला पुणे शहरात पावसाची शक्यता नाही. पण 6 नोव्हेंबरनंतर पावसाला पुणे शहरात पुन्हा एकदा सुरुवात होईल. तर 7 नोव्हेंबरला पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून महाराष्ट्र -गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्यानं केले आहे.

दरम्यान, आज सायंकाळी चारच्या सुमारास पुणे शहरासह मुंबईमध्ये दादर, परळपासून पुढे कुलाब्यापर्यंत अचानक आभाळ भरून आलं आणि पावसाला सुरुवात झाली.

 

Related posts: