|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » वीज मीटर प्री-पेड करणार : आर. के.सिंह

वीज मीटर प्री-पेड करणार : आर. के.सिंह 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आगामी काळात संपूर्ण देशभरात वीज मीटर प्री-पेड करण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेणार असल्याची शक्यता केंद्रीय वीज मंत्री आर. के.सिंह यांनी व्यक्त केली आहे. देशात कोणतेही मीटर पोस्ट पेड राहणार नसून प्रत्येक मीटर बदण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे काम सुरु करण्यात आले आहे. ते येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे सरकारचे  ध्येय सरकारचे असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

घटक राज्यांनी या कामाला पाठिंबा दिला असून मणिपूर, बिहार आणि उत्तर प्रदेशात वेगाने प्री-पेड वीज मीटर करण्याचे काम सुरु आहे. या योजनेमुळे वीज वितरण करणाऱया कंपन्यांमध्ये घट होण्याचे संकेत सरकारने व्यक्त केले आहेत. तर प्रत्येक घरात जाऊन मीटरचे रिडिंग घेण्यासाठी वेगळा कर्मचारी वर्ग, वीज बिल न भरणाऱया ग्राहकांची वीज तोडणे, ती पुन्हा जोडणे यासह अन्य समस्या सोडवण्यासाठी लागणारे कर्मचारी कपात करण्यात येणार आहेत.

प्री-पेड सुविधा

आतापर्यंत आपण वीज वापरल्यानंतर वीज बिल देत होतो. परंतु ते बंद होणार असून मोबाईल रिचार्ज प्रमाणे अगोदर वीज वापरण्याची रकम भरुन संबंधीत ग्राहकांना वीज वापरण्याची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी आपल्याकडे असणाऱया पैशातून कितीही रुपयाचा रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देणार असल्याचे मंत्री सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: