|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » बँकांनी डेबिट-क्रेडीट कार्डांच्या माहितीची सुरक्षा निश्चित करावी : आरबीआय

बँकांनी डेबिट-क्रेडीट कार्डांच्या माहितीची सुरक्षा निश्चित करावी : आरबीआय 

वृत्तसंस्था/ मुंबई

 देशातील बँकांनी आपल्या ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डांचा डाटा सुरक्षित असल्याचे निश्चित करावे अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) केली आहे. 13 लाख कार्डांचा डाटा ऑनलाईन उपलब्ध झाल्याची तपासणी करणयाचे आदेश आरबीआयने दिले असल्याचे रॉयर्टस न्यूजच्या वृत्तामधून दिले आहे.

जवळपास 13 लाख कार्डची माहिती 100 डॉलर (जवळपास 7 हजार रुपये) प्रति कार्ड विकत असल्याची माहिती सिंगापूरच्या सायबर डेटा ऍनालिसिस संस्था ग्रुप आयबीने सादर केलेल्या अहवालात सांगितले आहे. यामध्ये भारतीयाचे कार्ड 98 टक्के आहे. तर 18 टक्के कार्डची माहिती ही एकाच बँकेची असल्याचे समोर आले आहे. परंतु या बँकेच्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही.

उपलब्ध कार्ड

ऑगस्ट महिन्यातपर्यंत देशात 517 लाख पेडिट आणि 8,515 लाख डेबिट कार्ड असल्याचे आरबीआयच्या आदीसुचनेनुसार समोर आले आहे.

Related posts: