|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » आयटी कंपनी कॅग्निजेंट कर्मचाऱयांची कपात करणार

आयटी कंपनी कॅग्निजेंट कर्मचाऱयांची कपात करणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिग्गज आयटी कंपनी कॉग्निजेंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन कॉर्प येत्या काळात हजारो कर्मचाऱयांची कपात करणार आहे. तिमाहीतील नफा कमाईचे आकडे सादर केल्यानंतर कंपनीने ही घोषणा केली आहे. वरिष्ठ व अन्य कर्मचाऱयांसह मिळून तब्बल 13 हजार कर्मचाऱयांची कपात करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ही कपात जगभरातील सर्व ठिकाणची मिळून करण्यात येणार आहे. कंपनी लवकरच आपला काहीसा कंटेंट मॉडरेशनचा व्यवसाय बंद करणार आहे. यामुळे जवळपास 6 हजार कर्मचाऱयांची नोकरी जाण्याची भिती आहे.

लाखो भारतीयांचा समावेश

कॉग्निजेंट कंपनीत 2.9 लाख कर्मचारी कार्यरत असून यामध्ये 2 लाख भारतीय कर्मचाऱयांचा समावेश आहे. 30 सप्टेबर 2019 पर्यंत कर्मचाऱयांची एकूण संख्या 2,89,900 होती कॉग्निजेंट फेसबुक आयएनसीचा कंटेंट रिव्यू कंत्राटदार आहे. त्यामुळे यातील कर्मचारी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपत्तीजनक माहितीची देखभाल करत असते.

Related posts: