|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » सहाव्या सत्रातही सेन्सेक्समध्ये तेजीची झुळूक

सहाव्या सत्रातही सेन्सेक्समध्ये तेजीची झुळूक 

येस बँक 5 टक्क्यांनी नुकसानीत : निफ्टी 11,890.07 वर बंद

वृत्तसंस्था/ मुंबई 

मागील पाच सत्रातील तेजीच्या वातावरणाने मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सेन्सेक्सने आपला तेजीचा प्रवास कायम ठेवत सहाव्या सत्रात शुक्रवारीही बीएसई सेन्सेक्समध्ये तेजीची झुळूक पहावयास मिळाली आहे. सकाळी  सेन्सेक्स 67 अंकानी मजबूत होत 40,196.07 वर खुला झाला होता. परंतु दिवसअखेरिस सेन्सेक्स 35.98 टक्क्यांनी तेजी नोंदवत निर्देशाक 40,165.03 वर बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) निफ्टी दिवसअखेरिस 13.15 अंकानी वधारुन 11,890.60 वर बंद झाला आहे.

गेल्या काही सत्रात कंपन्यांचे नफा कमाईचे आकडे आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरिल घडामोडींचा प्रभाव भारता शेअर बाजारांवर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. तसेच आठवडय़ातील शेवटच्या सत्रातही सेन्सेक्सने तेजी नोंदवत बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये शुक्रवारी इंडसइंड बॅँक, टाटा स्टील, वेदान्ता, टेक महिंद्रा, ओएनजीसी, ऍक्सिस बँक आणि आयटीसीचे समभाग 5.18 टक्क्यांनी वधारले आहेत.  अन्य कंपन्यामध्ये येस ब्ँाकेचे समभाग 5.46 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. कारण सप्टेंबर तिमाहीचे आकडे बँकेने सादर करताच समभाग गडगडले आहेत. टीसीएस ,महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एशियन पेन्ट्स, टाटा मोटर्स, लार्सन ऍण्ड टुब्रो, एचसीएल टेक आणि एनटीपीसीचे समभाग मात्र 3 टक्क्यांनी घसरले आहेत.

मुख्य क्षेत्रातील उत्पादन घटल्याचा परिणाम

आर्थिक क्षेत्रातील मंदीचा प्रभाव अजून कमी झालेला नसून तो वेगवेगळय़ा प्रकारे वाढत असल्याचे समोर येत आहे. गुरुवारी मुख्य क्षेत्रातील उत्पादनाचा वेग ऑक्टोबर महिन्यात 5.2 टक्क्यांनी घटल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात गुंतवणूकरादारांनी सावध भुमिका घेतल्याचे पहावयास मिळाले आहे.

Related posts: