|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » गर्डर अंगावर पडल्याने मेट्रो कामगाराचा मृत्यू

गर्डर अंगावर पडल्याने मेट्रो कामगाराचा मृत्यू 

मुंबई / प्रतिनिधी

पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये 25 वर्षीय कामगार अर्षद शेखचा यु-गर्डर खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दहिसर ते डी. एन. नगर ‘मेट्रो मार्ग 2 अ’साठी हा गर्डर ट्रेलरवरून नेण्यात येत होता. सुमारे 100 टनाच्या या गर्डरच्या अपघात मध्यरात्री 3 वाजता समता नगर पोलीस स्टेशनजवळ झाला. ट्रेलरची जोडणी पीन पुलरमधून तुटल्यामुळे झालेल्या अपघातात गर्डर मागील वाहनावर पडला. त्यामध्ये मे. जे कुमारतर्फे कामावर असणारा अर्षद शेखचा मृत्यू झाला. पुलरचा चालक पळून गेला असून चालकाविरुद्ध समतानगर पोलीस ठाणे येथे उपनिरीक्षक बामणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा हायवे गेट समोरील ब्रिजवरती मध्यरात्रीच्या सुमारास मेट्रो रेल्वेचे यु-गर्डर वाहून नेणाऱया ट्रेलर आणि पुलरमधील कपलिंग तुटले. यु-गर्डर ट्रेलर उतरला गेल्याने मागे असलेली युटिलिटी म्हणजे प्रोटेक्शन कार ट्रेलर खाली जवळपास 200 फूट फरफरट गेली. युटिलिटीचा चालक अर्षद शेख खिडकी बाहेर पडल्याने चाकाखाली सापडला. तो गंभीर जखमी झाला. समता नगर पोलीस ठाण्याचे बिटमार्शल योगेश पाटील यांनी ताबडतोब पोलीस ठाणे व अग्निशमन दलास कळविले. बोरिवली अग्निशमन अधिकारी व जवानांनी अर्षदला बाहेर काढून उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले.

Related posts: