|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘गुडविन’च्या दुकानाचे तोडले टाळे

‘गुडविन’च्या दुकानाचे तोडले टाळे 

डोंबिवलीत अनेक बाधित ग्राहकांची दुकानासमोर गर्दी

डोंबिवली / वार्ताहर

गुडविन ज्वेलर्सचे मालक कुमार बंधूनी अनेक गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणूक केल्याने डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामनगर पोलिसांनी गुंतवणूकदारांची नावे, मोबाईल नंबर आणि किती रक्कम गुंतविली होती याची माहिती घेतली. त्यानंतर हा गुन्हा ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या नेतफत्वाखालील पोलीस बंदोबस्तात डोंबिवलीतील गुडविन ज्वेलर्सच्या दुकानाचे टाळे तोडण्यात आले.

मात्र, पूर्ण रॉड असल्याने शटर उघडले जात नसल्यामुळे त्याचे कटींग केल्यानंतरच शटर उघडण्यात पोलीस यशस्वी झाले. पूर्वेकडील मानपाडा रोडवरील गुडविन ज्वेलर्स दुकानाचे टाळे तोडण्यात येत असल्याचे पाहण्यासाठी गुंतवणुकदारांची दुकानाबाहेर गर्दी केली होती. काहीतरी आपल्याला मिळेल या आशेपोटी बाधित उपस्थित होते. दुकानाचा पंचानामा करत असताना गुंतवणुकदार बाहेर उभे होते. टाळे तोडण्यात आल्यानंतर दुकानात सामानखेरीज काहीही नव्हते. पोलिसांनी गुंतवणुकदारांना दुकानाच्या बाहेर काही अंतरावर उभे राहण्यास सांगितले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे आले असता गुंतवणुकदारांना त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडले. दरम्यान, गुडविन ज्वेलर्समध्ये गुंतवणूक केलेले अनेक बाधित आले. त्यांनी फसवणूक झाल्याची माहिती सांगितली. त्या सर्वांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला संतोष केले यांनी दिला. सुमारे दोन तासांच्या प्रतीक्षेनंतरही पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Related posts: