|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुलांची हत्या करुन पित्याने केली आत्महत्या

मुलांची हत्या करुन पित्याने केली आत्महत्या 

मुलगी गंभीर : दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

वार्ताहर/ बेंबळे

मेव्हणी बरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरुन जन्मदात्यानेच आपल्या पोटच्या तीन मुलांना कीटकनाशक पाजले आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माढा तालुक्यातील बेंबळे येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला असून, मुलगी गंभीर आहे.

 याबाबतची सविस्तर माहिती अशी, रविंद्र लोखंडे पुणे जिह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचा रहिवासी असून, तो माढा तालुक्यातील बेंबळे येथे  मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांच्यासह आपल्या मेव्हणीला भेटायला आला होता. काही कारणाने त्यांच्यात वाद झाला. त्यावर रविंद्र घोटी रस्त्यावर उजनी डावा कालव्याच्या नजीक गेला. मुलांना शीतपेयातून कीटकनाशक पाजले व स्वतः बेंबळे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 दरम्यान मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का या तिघांनाही उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आयुष रविंद्र लोखंडे (वय 6) व अजिंक्य रविंद्र लोखंडे (वय 8) यांचा गुरुवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी अनुष्का हिस पुढील उपचाराकरिता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 रविंद्र लोखंडे याच्या खिशात चिठ्ठी आढळली असून, त्यामध्ये त्याने म्हटले आहे की माझे व मेव्हणीचे प्रेमसंबंध होते. मात्र तिने माझा विश्वासघात केला. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. तर माझ्या व मुलांच्या मृत्यूस केवळ माझी मेव्हणी हिला जबाबदार धरण्यात यावे, असाही उल्लेख आहे. या घटनेचा अधिक तपास टेंभूर्णीचे पोलिस सपोनि राजेंद्र मगदूम करत आहेत.

मुलांच्या मृत्यूबाबत परिसरात हळहळ

प्रेमसंबंधातून घडलेल्या या प्रकारात रविंद्रने स्वतःच्या संबंधासाठी मुलांना कीटकनाशक पाजून का मारले, याबाबत आश्चर्य व्यक्त करत मुलांच्या जाण्याबाबत परिसरातील नागरिकांतून हळहळ व्य़क्त केली जात आहे.

 

Related posts: