|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एक जखमी

नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एक जखमी 

ऑनलाईन टीम / सावनेर :

नागपुरात जुन्या घराची भिंत कोसळून दोन मजूरांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. सावनेर तालुक्मयातील बोरूजवादा येथे आज सकाळी 6.25 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सुरेश रामकृष्ण करनरकर (30), अतुल शिवराम उईके (17) अशी मृत मजुरांची नावे आहेत. तर उर्मिला शिवराम उईके या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेतील मृत आणि जखमी महिला बोरुजवाडा येथे एका जुन्या घरात भाडय़ाने राहत होते. पावसामुळे या घराची भिंत कमकुवत झाली होती. आज सकाळी काही समजायच्या आतच ही भिंत तिघांवर कोसळली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतहेद बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. दुर्घटनेतील जखमी महिला उर्मिला यांना नागपूर मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related posts: