|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; जेष्ठाला अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; जेष्ठाला अटक 

ऑनलाईन टीम / पुणे :

फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया ज्येष्ठ नागरिकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशोक गुजाबाजी डांगोरे (वय 65, रा. मुंजोबावस्ती, धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 7 वर्षीय पीडीत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डांगोर हा पीडीत मुलीला कुत्र्यासोबत फिरायला नेण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. जवळच्याच एका घरा शेजारी इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथे डांगोरे यांने पीडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पुढील तपासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिल लिना पाठक यांनी केली होती. न्यायालयाने ती मान्य केली आहे. 

Related posts: