|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘गंगुबाई काठियावाडी’ मध्ये हृतिक रोशन – आलिया भट ?

‘गंगुबाई काठियावाडी’ मध्ये हृतिक रोशन – आलिया भट ? 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील हाजी मस्तान या भूमिकेसाठी अभिनेता हृतिक रोशनला विचारणा करण्यात आली आहे. आणि त्याने देखील या चित्रपटासाठी होकार दिल्याचं कळतंय.

‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया भटही असणार आहे. त्यामुळे हृतिक रोशन आणि आलिया भट ही जोडी पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हृतिक- आलियाच्या सोडीसोबत या चित्रपटामुळे हृतिक आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारिश’ या चित्रपटानंतर तब्बल 9 वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणार आहेत. हुसेन झैदी आणि जेन बोर्जेस या लेखकांनी लिहिलेल्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई-स्टोरीज ऑफ विमेन फ्रॉम दि गँगलँड्स’ या पुस्तकावर आधरित असणार आहे.

मुंबईत काही वर्षांपूर्वी वेश्याव्यवसायात एका महिलेने आपली हुकुमत गाजवली. ती म्हणजे गंगूबाई कोठेवाली. याच गंगूबाईच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. वेश्याव्यवसाय हा गुन्हा नसून ती एक सामाजिक गरज असल्याचे सूत्र तिने मांडले. वेश्याव्यवसाय करणारी महिला बदफैली असते अशी ओरड करणाऱयांना आझाद मैदानातील मोर्च्यात ‘मी घरवाली आहे घर तोडणारी नाही’ असे ठणकावत प्रथमच वेश्यांचा आवाज सामाजिक पटलावर आणला.

 

Related posts: