|Thursday, February 20, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘बाला’ गाण्यावर मुलांसोबत थिरकला रितेश देशमुख

‘बाला’ गाण्यावर मुलांसोबत थिरकला रितेश देशमुख 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल 4’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. रिलीजच्या आठ दिवसांत चित्रपटाने 149.36 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटातील ‘बाला’ हे गाण प्रचंड गाजत असून सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेक जण या गाण्याचे चॅलेंज स्विकारुन थिरकताना दिसले.

या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता रितेश देशमुखनेही रियान आणि राहिल या त्याच्या दोन्ही मुलांसोबत या गाण्यावर ताल धरला. या तिघांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटाचा व्यवसाय 150 कोटींच्या घरात गेला असून हा आनंद व्यक्त करत असल्याचे रितेश म्हणाला.

‘हाऊसफुल 4’ या चित्रपटातील ‘बाला’ हे गाणं अभिनेता अक्षय कुमार याच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये अक्षयने भन्नाट डान्स स्टेप केल्यामुळे हे गाणं तरुणाईमध्ये लोकप्रिय होत आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात रितेशसह अक्षय कुमार, बॉबी देओल, राणा डग्गुबती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लिव्हर, क्रिती सेनॉन, क्रिती खरबंदा, पूजा हेगडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

Related posts: